मारीहाळ गावाला सांस्कृतिक भवन देणार ; लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ठोस आश्वासन

प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; मारीहाळ गावच्या मराठा नेत्यांनी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची अनेक वेळा भेट घेऊन, मराठा सांस्कृतिक भवनाचे निर्माण कार्य करण्यासाठी, सरकारकडून अनुदान मिळवून देण्याची विनंती केली होती.
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना विनंती पत्र सादर केले. आमदार हेब्बाळकर यांनी ते विनंती पत्र स्वीकारले, आणि त्यांना ठोस आश्वासन दिले की, हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवून त्यांच्या सल्ल्याने निश्चितपणे मंजूर करून घेईन.
विनंतीपत्र स्वीकारताना रामचंद्र चव्हाण, बसवराज म्यागोटी, फकीर संगोजी, विठ्ठल मल्हारी, शिवराय साळुंखे, विनोद चव्हाण, अशोक साळुंखे, सदाशिव धर्मोजी, सुरेश कित्तूर, बसवण्णे जानकी, नारायण जानकी, सिद्राम मुगळी, राम संगोजी, आणि इतर उपस्थित होते.
ग्रहनिर्माण आदेश पत्रांचे वितरण; वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ