प्रगती वाहिनी, प्रतिनीधी, नवी दिल्ली – सुशांत सिंग राजपूत, कंगना राणावत आणि आता मराठा आरक्षण या एकामागोमाग एक प्रकरणाना तोंड देताना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला नाकीनऊ आले आहेत. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही.
गुरुवारी त्यांनी कर्नाटकमधील आघाडीचे सरकार पाडणार्या रमेश जारकीहोळी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस ची चर्चा जोर धरू लागली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशानुसार, कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी एट्री केल्याचे म्हटले जाते. कर्नाटकमधील आघाडी सरकार पाडून भाजपला सत्तेत आणणारे रमेश जारकीहोळी यांची महाराष्ट्रातही चांगली पक्कड आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आणि भाजप राज्यात महविकास आघाडी स्थपण झाल्यापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राज्यातील राजकीय सद्यपरिस्थितीचा आढवा घेत नाराज आणि महत्वाकांक्षी आमदारांना भाजपमध्ये सामील करून घेण्याची रणनीती आखली जात आहे. आणि यात
रमेश जारकीहोळी मुख्य भूमिका निभावू शकतात. त्यामुळे फडणवीस जरकिहोली भेटीमुळे ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ