Latest

राज्य पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ

  प्रगतीवाहिनी वार्ता;   बेंगळूरु;  राज्य पोलीस दलामध्ये सबइन्स्पेक्टर पदाची, चार हजार पदे रिक्त असून, ती भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, असे गृहसचिव अरग ज्ञानेन्द्र यांनी सांगितले.  राज्य पोलिस दलातील कमतरता भरून काढणे आणि फोरेन्सिक लॅबोरेटरी अद्यावत करणे,  या कामांना आद्यता देणार आहे, असे त्यांनी सांगितले.  येडीयुरप्पा मुख्यमंत्री होण्याआधी राज्यामध्ये 33000 पोलिसांच्या जागा रिक्त होत्या, त्या सर्व जागा हप्त्याहप्त्याने भरण्यात येणार आहेत, सध्या चार हजार पोलिस उपनिरीक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत, या जागांवर भरती करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे त्यांनी सांगितले.  सध्या पोलीस दलात 402 सहाय्यक उपनिरीक्षक आणि 545 पोलीस उपनिरीक्षक  (सिव्हिल) जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबर 3 रोजी, 545 उपनिरीक्षक
 पदासाठीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button