हिरेकुडीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आर ओ प्लांटचे मंत्री शशिकला जोले व खासदार आण्णासाहेब जोले हस्ते उदघाटन
प्रगतीवाहिनी न्युज / चिकोडी –
नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रत्येक गावात आशा प्रकारचे आर ओ प्लांट सुरू करीत आहे. नागरिकांनी याचा योग्य वापर करावा असे आवाहन खासदार अण्णासाहेब जोले यांनी केले.
आज तालुक्यातील हिरेकुडी येथे जोले उद्योग समूहाच्यावतीने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण आरओ प्लांटचे उदघाटन करून ते बोलत होते.
याचवेळी बांधकाम मजूर, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना आहार किटचे वाटप केले.
पुढे ते म्हणाले कोव्हीड व महापूर काळात सरकारने नागरिकांना त्रास होऊ नये असे चांगले काम केले आहे. प्रत्येक गावात विकासकामे राबवित असल्याचे सांगितले.
यावेळी राज्याच्या धर्मदाय व वक्फ मंत्री सौ शशिकला जोले उपस्थित होत्या.
यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्षा सौ अनिता देवडकर, रेवय्या हिरेमठ, भरत देवडकर , सुभाष चौगला, सुदर्शन चौगला, शंकर मायनवर यांच्यासह इतर उपस्थित होते.
बेळगावीत रविवारी नृत्य वैविध्य
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ