Latest

कोयना धरणात 103.19 टीएमसी पाणी साठा

प्रगतीवाहिनी न्युज / सातारा – 
पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकासाठी वरदान असलेल्या कोयना धरणात 103.19 टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे.
आज दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 .19 वाजता धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच झाली असून धरणामध्ये 103.19 TMC पाणीसाठा झाला आहे.
तशातच पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाळ्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढ होणार आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी *आज दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता धरणाची वक्रद्वारे 1 फुट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 10000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार आहे. तसेच, धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
यामुळे पुढील कांही दिवसात चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button