Kannada NewsKarnataka News
वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची आत्महत्या

प्रगती वाहिनी न्यूज ,बेंगळूरू: वरिष्ठ आयएएस अधिकारी डीएम विजय शंकर यांनी आत्महत्या केली आहे. आय एम ए घोटाळा प्रकरणात ते प्रमुख आरोपी असल्याचे समजते. याप्रकरणी त्यांनी पाच कोटी रुपयांची लाच मागितली होती तर एक कोटी रुपये त्यांनी घेतले होते या आरोपाखाली त्यांना अटक होऊन कारागृहात पाठवले होते त्यांच्या घरावर जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी धाड घातली होती ती त्यावेळी दोन कोटी रुपये रक्कमही ही मिळाली होती.
यांना पुन्हा ताब्यात देण्यासाठी सीबीआयने परवानगी विचारली होती तसेच आय एम ए प्रकरणातील ते 18 वे आरोपी होते. या प्रकरणात आणखीन काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.




