प्राथमिक शाळा प्रारंभ- विषय विचाराधीन – मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

      प्रगतीवाहिनी वार्ता;   बेंगळूरू;     राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा काही प्रमाणात वाढत असल्यामुळे,
1ली ते 5वी पर्यंतचे नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना, मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले की, उद्यापासून सहावी ते आठवी चे नियमित वर्ग सुरू होणार आहेत. आठवड्याचे फक्त पाच दिवसच आणि अर्धवेळ शाळा चालवण्यात येतील. सर्व प्रकारची पूर्व खबरदारी घेऊन आणि सुरक्षा नियमांचे पालन करुन शाळा भरवण्यात येतील.
प्राथमिक शाळेचे नियमित वर्ग सुरू करण्याबद्दल सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, कोविडचा प्रसार तसेच पॉझिटिव्हिटी दर यांचा विचार करून, नंतर निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

  सार्वजनिक गणेशोत्सवात नियम पाळण्याची अट – मुख्यमंत्री नेतृत्वातील सभेचा निर्णय

5 Thousand Teachers to be appointed in the current year: CM Basavaraja Bommai

Home add -Advt

Related Articles

Back to top button