Kannada NewsKarnataka NewsLatest

उत्तर कर्नाटक भागाला राज्य सरकारचा मोठा झटका

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगावी आणि उत्तर कर्नाटकच्या जनतेला सरकारने मोठा धक्का दिला असून बेळगावी सुवर्ण सौद येथे स्थलांतरित होणार असलेल्या साखर निर्देशनालय बेळगावाला स्थलांतरित न करता बेंगलोर मध्येच दुसऱ्या खात्या सोबत विलीन करण्यास सरकार तयारी करत आहे.
साखर निर्देशनालयाचे कामकाज कमी आहे आणि काहीअधिकाऱ्यांचे पदे भरली न गेल्या असल्यामुळे सरकारने वेगळे साखर निर्देशनालय हवे कशाला, असा विचार करून हा प्रस्तावच नामंजूर करण्याचा विचार करत आहे.

साखर निर्देशनालय या आधी सुवर्ण सौद बेळगावला स्थलांतरित करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते यामुळे या भागातील साखर उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला होता पण आता मात्र मंत्रिमंडळ परिषद साखर उत्पादक आयुक्तांनी साखर निर्देशनालय उद्योग आणि वाणिज्य विभागात विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला असून यासाठी उपसमितीची रचना करण्यात आली आहे. याबद्दल अंतिम निर्णय होईपर्यंत साखर निर्देशनालय बेंगलोर मध्येच कार्यरत रहावे असे मंत्री शिवराम हेब्बार यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
या बरोबरच उत्तर कर्नाटकच्या जनतेला अन्याय होत असताना या भागातील जनप्रतिनिधीनी सरकार जी पावले उचलत आहे याच्या विरोधात आवाज उठवावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.
सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शेतकरी संघटना तसेच हसिरू सेनेचे प्रमुख, साखर नियंत्रण मंडळी सदस्य चूनाप्पा पुजारी यांनी आक्षेप घेतला असून याबद्दल सोमवारी बेळगाव भेटीवर येणाऱ्या साखर मंत्री शिवराम हेब्बार यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.

 

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button