अचानकपणे नदीत कोसळला बालक ; बचाव करण्याऱ्या आईचा मृत्यू

वॉकिंगला गेलेल्या माता- पुत्राचा दुर्दैवी अंत

प्रगतीवाहिनी न्युज / कुंदापूर –

सकाळी वॉकींगला गेलेल्या आई व मुलगा दोघेजण नदीत पडल्याने मरण पावल्याची घटना गंगोळीनजीकच्या चुंगीगुडे येथे घडली आहे.
पत्रकार नोएल चुंगीगुडे यांची पत्नी रोसरियो व पुत्र शान ( वय 11) असे मयत माता पुत्रांची नावे आहेत.
रोजच्याप्रमाणे आज देखील घरानजीकच्या नदी किनारी माता व पुत्र वॉकिंगला गेले होते. यावेळी मुलगा शान याचा पाय घसरून पाण्यात पडला. यावेळी आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली. यामुळे दोघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाचे कर्मचारी, गंगोळी पोलीस कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

बेळगावीत कोरोनाची कमालीची वाढ

Home add -Advt

Related Articles

Back to top button