दोन ट्रकमध्ये जोराची धडक
प्रगतीवहिनी न्युज / चन्नमा कितुर – तालुक्यातील इटगी क्रॉस राष्ट्रीय महामार्ग 4 वर दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात घडून दोन ठार तर एकजण गंभीर जखमी झाले असून बेळगावी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
बेळगावीकडून धारवाडकडे जाणारा ट्रक इटगी क्रॉस राष्ट्रीय महामार्गावर बंद पडून थांबल्याने त्यांना संबंधित दुसऱ्या ट्रक चालक असे दोघे मिळुन ट्रकच्या बाजूला थांबून दुरुस्त करीत असताना दुसऱ्या अन्य एका ट्रकने मागून धडक दिल्याने जागीच चालक ठार झाला तर अन्य एक चालक धारवाड इस्पितळात मरण पावला.
गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड येथील रहिवाशी कुडलेप्पा नेल्लूर (वय 42), गदग जिल्ह्यातील विरापूर गावातील रहिवासी यल्लप्पा सन्नयलाप्पा घोरपडे (वय 52) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. मागून ट्रकला धडक दिलेला चालक राकेश ( वय 37) गंभीर जखमी झाला असून बेळगावी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी कितुर सीपीआय मंजुनाथ कुसगल, पीएसआय देवराज उळागड्डी भेट दिले. या प्रकरणी कितुर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ