*Sanjeev Kattishetti Unanimously Re-elected as FKCCI Director for Third Consecutive Term*

Sanjeev Kattishetti Unanimously Re-elected as FKCCI Director for Third Consecutive Term
Pragativahini News/ Belagavi: Former President of the Belgaum Chamber of Commerce and Industries (BCCI), Sanjeev Kattishetti, has been unanimously elected unopposed as a Director of the Federation of Karnataka Chambers of Commerce and Industry (FKCCI), Bengaluru, for a remarkable third consecutive term.
With no other candidate contesting the election, Kattishetti was elected unanimously and unopposed. His consecutive re-election for a third term is a significant recognition of his contribution to the business and industrial community of Belagavi and North Karnataka, as well as the confidence placed in his leadership and experience.
During his new term, Kattishetti will represent the districts of Belagavi, Bagalkot and Uttara Kannada at the state-level apex chamber. His role will include representing the concerns, challenges and aspirations of entrepreneurs, industrialists, traders and the wider business community from these three districts before the FKCCI.
His continued association with FKCCI is expected to provide a stronger platform for raising issues concerning industrial growth, trade, infrastructure, investment, ease of doing business and other key economic matters affecting the region.
Kattishetti’s re-election for a third consecutive term is a matter of pride for the Belagavi business and industrial community. His extensive experience and active engagement with the trade and industry sector are expected to further strengthen the voice of Belagavi, Bagalkot and Uttara Kannada at the state level.
FKCCI संचालकपदी संजीव कत्तीशेट्टी यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड
बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (BCCI)चे माजी अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी यांची फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FKCCI), बंगळुरूच्या संचालकपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
FKCCI संचालकपदाच्या निवडणुकीत संजीव कत्तीशेट्टी यांच्या विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा संचालकपदी निवड होणे ही बेळगावसह उत्तर कर्नाटकातील व्यापारी व औद्योगिक क्षेत्रासाठी त्यांनी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या नेतृत्वावर व्यक्त झालेल्या विश्वासाची महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.
नवीन कार्यकाळात संजीव कत्तीशेट्टी हे बेळगाव, बागलकोट आणि उत्तर कन्नड या तीन जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या माध्यमातून या जिल्ह्यांतील उद्योजक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्रासमोरील विविध समस्या, मागण्या तसेच विकासाच्या संधी FKCCIच्या राज्यस्तरीय व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आणि व्यवसाय सुलभता यांसह उद्योग-व्यापार क्षेत्राशी संबंधित विविध विषयांना राज्यस्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
FKCCIमध्ये सलग तिसऱ्यांदा संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल बेळगावच्या व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या अनुभवामुळे बेळगाव, बागलकोट आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांतील उद्योग-व्यापार क्षेत्राचा आवाज राज्यस्तरावर आणखी बुलंद होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



