Kannada NewsKarnataka News

रोटरी क्लब ऑफ बेलगाम नॉर्थ च्या वतीने एकाच दिवशी पाचशे झाडांचे वृक्षारोपण करून रचला नवा इतिहास

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: रोटरी क्लब बेळगाव नॉर्थ एकाच वेळी 500 झाडे लावून एक नवीन अध्याय रचला असून प्रत्येक नागरिकाने दरवर्षी एक तरी झाड लावावे असे आवाहन सी बी करुणाकर यांनी केले.
के एस आर पी च्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते, वनखात्याचे डीसीएफ अमरनाथ एम वी, तसेच के एस आर पी कमांडंट अमजा हुसेन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
रोटरीचे माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, उपप्रांतपाल अजय हेडा तसेच वनविभागाच्या सहकार्यामुळेच 500 झाडे लावून येवढा मोठा उपक्रम करण्यात आल्याचे सेक्रेटरी शशिकांत सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजय हेडा तसेच के एस आर पी वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले
उपाध्यक्ष जी एस पाटील, माजी अध्यक्ष सुरेश एस व इतर रोटेरियन उपस्थित होते.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button