प्रगती वाहिनी न्यूज ,बेळगावी:कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत
आहे. या दृष्टीने 24 जून रोजी चवाट गल्ली येथील मारुती मंगल कार्यालयात 50 नागरिकांचे कोरोना स्वॅब चाचणीचे
आरोग्य तपासणी करण्यात आले.
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने रोग प्रतिकार क्षमता वाढविणे देखील गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माणसं
जात असतात. त्यांचा कोरोना विषाणूच्या
संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी त्यांची देखील
रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. याचाच एक
भाग म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.असे सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव यांनी सांगितले.
आरोग्य तपासणी मध्ये थर्मल स्कॅनिंग, नाडीचे ठोके, आणि ऑक्सिजनचे प्रमाण, घशातील आणि नाकातील स्वब
घेण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर
येथील वैद्यकीय अधिकारी जगदीश पाठणे, लॅब निरीक्षक उमा कलाल, डी.एम .ए.सुरेखा कुंभार,डॉ.नर्स निशा कोलकार, गीता भावीमनी, सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव यांनी आरोग्य तपासणी करण्यात यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ