संगोळी रायान्ना को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालमत्ता लिलाव प्रक्रियेला लवकरच सुरुवात
प्रगती वाहिनी न्यूज बेळगावी: बेळगावी येथील क्रांतिवीर संगोळी रायान्ना कोऑपरेटिव सोसायटीची मालमत्ता तसेच त्यांच्या मालकीच्या जागेचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. आलेल्या पैशातून ठेवीदारांना व्याजासहित ठेवीदारांचे पैसे परतफेड करण्याचा सरकार कडून प्रयत्न केला जाणार आहे.
बेळगांव उपविभाग अधिकाऱ्यांनी यासंबंधी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून संगोळी रायान्ना सोसायटीच्या 110 जागेची सार्वजनिकरित्या लिलाव करण्यासाठी मंजुरी द्यावी अशी विनंती केली आहे.याप्रकरणी उपविभाग अधिकाऱ्यांनी सोळा पदाधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे.
कन्नड चित्रपट निर्माते आनंदा अप्पुगोळ हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून ठेवीदारांना पैसे ठेवलेल्या पैशाचा रियल एस्टेट तसेच चित्रपट निर्मिती निर्मिती साठी वापर केला आहे असा आरोप करण्यात आलेला आहे.
संस्थेच्या ठेवीदारांनी 324 कोटीपेक्षा जास्त रक्कम सोसायटीने परतफेड करावी यासाठी 100 हून अधिक ग्राहकांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ