Kannada NewsKarnataka News

अपप्रचार करीत असताना देखील बेळगावी ग्रामीण मतदारसंघात विकासकामांचा झपाटा

विविध गावांमध्ये मंदिराच्या विकासकामांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली चालना

प्रगतीन्यूज / बेळगावी –
विरोधकांकडून होत असलेल्या अपप्रचारातच बेळगावी ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारसंघात विकासकामे राबवित आहेत.
बुधवारी मतदारसंघातील मुतगा गावात आदिशक्ती माता देवस्थानाच्या नूतन बांधकाम निर्मिती कामाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चालना दिली.
आमदार निधीतून या मंदिराला 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी गावातील पंच, देवस्थान कमिटीचे सदस्य, रायना मल्लवगोळ, सचिव भागना कोंपी, मारूती मल्लवगोळ, भरमा मलवगोळ, मारुती कोंपी व इतर उपस्थित होते.

मतदारसंघातील होनिहाळ गावातील श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या नुतन इमारत बांधकामाला देखील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी चालना दिले. या देवस्थानासाठी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे.
यावेळी गावातील पंच, देवस्थान कमीटीचे सदस्य, कडबुगोळ, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश कड्यागोळ, अफसर भाय, नूर भाय व कार्यकर्ते उपस्थित होते.
मारिहाळ गावातील नूतन मराठा सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी गावाला भेट देऊन स्थानिक नेत्यांसोबत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चर्चा करून ठिकाणाची पाहणी करून, लवकरच सांस्कृतिक भवन इमारत बांधकाम घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी गावातील पंच, बसवराज म्यागोटी, रामचंद्र चव्हाण, शिवराम साळुंखे, फकीर मोदगे, मलप्पा कलनवर, बसवणी जानकी आदी उपस्थित होते.

बेळगावी ग्रामीण मतदारसंघातील खणगाव बी के गावात श्री लक्ष्मी देवीच्या नूतन मंदिर वास्तू निर्मितीसाठी आमदार निधीतून 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, बुधवारी देवस्थान वास्तूबदल अभियंता व ग्रामस्थांसोबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चर्चा केली.
यावेळी गावातील पंच, देवस्थान कमीटीचे सदस्य, शंकरगौडा पाटील, अडीवेश इटगी, पार्वती हिरेमठ, रुक्मिणी होसमनी, लगमन्ना चचडी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button