Kannada NewsKarnataka NewsLatest

सहकारी बँक फेडरेशनवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

प्रगती वाहिनी न्यूज, बेळगावी: बेळगावी जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह सौहार्द सहकारी बँक असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली आणि या बैठकीत रिक्त झालेल्या 3 जागा भरण्यात आल्या
कार्यकारिणी सदस्य म्हणून पायोनियर अर्बन बँकेचे नूतन संचालक अनंत लाड यांची तर तुकाराम बँकेचे संचालक प्रदीप
ओऊळकर यांची सचिव म्हणून आणि पाच्छापूर अर्बन बँकेचे संचालक अमरनाथ महाजनशेट्टी यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली
यासंदर्भात नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन असोसिएशनचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी असोसिएशनचे गौरव अध्यक्ष मल्लिकार्जुन चूनमुरी, अध्यक्ष बाळाप्पा कग्गनगि, उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्यासह संचालक एस आय पालभावी, एस एम रेवणकर ,वाय एस मिरजी, आर टी शिराळकर ,एस बी निलजगी, एस बी पतनेवर ,एस जी ढवळेश्वर ,आर वी बेलद ,ए एम पाटील आणि सभासद बँकांचे मुख्य व्यवस्थापक व सल्लागार सदस्य उपस्थित होते

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button