प्रगतीवाहिनी न्युज / बेळगावी –
भरतमुनीनी रचलेले भरतनाट्य कला आपण भारतीय आज देखील जोपासत आहे. बेळगावीच्या शांतला नाट्यालय हजारो मुलांना भरतनाट्य शिकविण्याचे प्रशंसनीय कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार राज्य अटलजी जनस्नेही केंद्राच्या संचालिका गंगुबाई मानकर यांनी काढले.
रविवारी बेळगावीत शांतला नाट्यलयाच्या 32 व्या वर्धापनदिन उत्सवाचे उदघाटन करून त्या बोलत होत्या. कोरोनामुळे आपण सर्वजण हसणे, आनंद विसरलो आहोत. आशा प्रसंगी मुले भरतनाट्य कला सादर करून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू, आनंद आणत आहेत असे सांगितले.
कर्नाटक संगीत नाट्य अकादमी सदस्या हेमा वाघमोडे बोलताना म्हणाल्या आज देखील मोठ्या संख्येने मुले भरतनाट्य शिकण्यास येते असणे आनंदाची बाब आहे. शांतला नाट्यालयाच्या रेखा हेगडे म्हणाल्या मागील 32 वर्षांपासून सातत्याने इतक्या मोठया प्रमाणात भरतनाट्य शाळा चालवीत असणे प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार, प्रगतीवाहिनी संपादक एम. के.हेगडे बोलताना म्हणाले भरत नाट्याला श्रीमंत केलेली शांतला नाट्यालय बेळगावीचा अभिमान. 32 वर्षांचा भव्य इतिहास असलेल्या या संस्थेला अजूनपर्यंत राज्योत्सव पुरस्कार मिळाला नाही मोठी शोकांतिका आहे. या वर्षी तरी या संस्थेला पुरस्कार देऊन राज्योस्तव पुरस्काराचे महत्व वाढविण्याचे काम व्हावे असे सांगितले.
कन्नड संस्कृती खात्याचे सहायक संचालिका विद्यावती भजंत्री म्हणाल्या बेळगावीत शांतला नाट्यालयाने मिळविलेले यश किती स्तुती करेल तितके कमी आहे. या संस्थेला यंदा राज्योस्तव पुरस्कारासाठी शिफारस करतो असे सांगितल्या.
यावेळी शेकडो मुलांकडून विविध नृत्य कार्यक्रम सादर केले.
शांतला नाट्यालयाच्या प्रमुख रेखा हेगडे, संचालिका श्रीमती हेगडे, अशोक हेगडे, रूपा आदी होते. शेकडो संख्येने मुले, पालक सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे या कार्यक्रमास प्रायोजकत्व लाभले होते.
ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ