Kannada NewsKarnataka News

बेळगावमधून दोन महिला बेपत्ता

 पोलिसात प्रकरण दाखल

प्रगतीवाहिनी वार्ता; बेळगावी; बेळगावीच्या हिंडलगा येथील रामदेव गल्लीची रहिवासी, प्रियांका मिसाळ ( वय सत्तावीस ) ही महिला, बुधवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला, ब्युटी पार्लरला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परत आलेली नाही. बेळगावी ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. प्रियांकाचे वय सत्तावीस वर्षे,असून ती पाच फूट उंच आहे. गोल चेहरा आणि गहू वर्णाची आहे. प्रियांकाने लाल टॉप आणि ऑरेंज बलून पँट घातली आहे. ती मराठी आणि हिंदी भाषा बोलते. या महिलेबद्दल ज्यांना माहिती मिळेल, त्यांनी बेळगावी पोलीस कंट्रोल रूम 0831– 240 52 33 , ग्रामीण पोलीस इन्स्पेक्टर 94 8080 421 , बेळगावी ग्रामीण पोलीस ठाणे इन्स्पेक्टर 0831–2405 3252 , किंवा बेळगावी ग्रामीण पोलीस ठाणे 0831–240 5252 या क्रमांकाशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.
अनुषा चडचण्णावर
खासबागच्या राघवेंद्र कॉलनीच्या रहिवासी अनुषा चडचण्णावर वय तेवीस, ही महिला बुधवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता निघून गेली आहे. शहापूर पोलीस ठाण्यामध्ये हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. अनुषाचे वय 23 वर्षे असून ती पाच फूट उंच आहे. चेहरा उभट असून सुदृढ शरीरयष्टी आणि गहूवर्णाची आहे. तिने काळ्या रंगाचा चुडीदार, पांढर्‍या रंगाची पॅंट आणि लाल रंगाचा दुपट्टा असा पेहराव केला आहे. ती कन्नड, हिंदी, आणि इंग्लिश बोलू शकते. या व्यक्तीबद्दल ज्याना माहिती मिळेल त्यांनी पोलीस कंट्रोल रूम, 0831–2405 233 शहापूर पोलीस स्टेशन ठाणे 08 31–2405 244 किंवा शहापूर पोलीस इन्स्पेक्टर 94 80 80 40 46 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

ಪ್ರಗತಿವಾಹಿನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ಬೇರೆ ಗ್ರುಪ್ ಗಳಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ

Related Articles

Back to top button